महागाईचा वणवा भडकणार, जीएसटीचा किमान दर 8 टक्क्यांवर जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात महागाईचा वणवा आणखी भडकणार असून याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. जीएसटी परिषदेने पुढील बैठकीत जीएसटीचा किमान कर दर 5 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार केला आहे.

या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवण्याचे उद्दीष्ट केंद्रातील मोदी सरकारने डोळ्यापुढे ठेवले आहे. परिणामी, दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

केंद्र सरकारने स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासह केंद्रावरील भरपाईसंबंधी राज्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. या अनुषंगाने जीएसटी प्रणालीमध्ये सूट असलेल्या वस्तूंच्या यादीतही फेरबदल केला जाणार आहे.