
इन्स्टाग्राम लहान मुलांसाठी नवीन ऍप लाँच करणार आहे. हे ऍप म्हणजे इन्स्टाग्रामचे एक नवीन व्हर्जन असेल. इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तर दुसरं व्हर्जन 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असेल. लहान मुले सेफ मोडमध्ये या इन्स्टाग्राम व्हर्जनचा वापर करू शकणार आहेत.
सध्याच्या इन्स्टाग्राम पॉलिसीनुसार 13 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले ते वापरू शकत नाहीत. तसेच मुलं त्यांचे पालक आणि व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. त्यामुळे आता सुरक्षित असे किड्स फोकस्ड व्हर्जन आणले जाणार आहेत. त्याचे काम इन्स्टाग्रामचे प्रमुखे ऍडम मोस्सेरी बघणार आहेत.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील कंटेंट काढून टाकण्यासाठी दबाव वाढलेला आहेत. अशा परिस्थितीत मुलांसाठी स्वतंत्र ऍप तयार करण्याची मागणी होत आहे.




























































