भर दिवसा चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

>> प्रसाद नायगावकर

लग्न सोहळ्यानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या परिवारांच्या घराची रेकी करून दिवसाढवळ्या त्यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून येणाऱ्या टोळीला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने तसेच नेर पोलिसांनी एकाच वेळी तपास करून यातील आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सुमारे 5 लाखाचा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या टोळीची चोरी करण्याची पद्धत फार वेगळी होती . रोजी नेर शहरातील सकाळी दहा ते पाच या वेळेत शहरातील सहा घरांचा कुलूप तोडून चोरटयांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास केला होता चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी त्या घरांची रेकी करून घेतली होती या रेकीमध्ये जी घर बंद दिसली त्या घरांना त्यांनी आपले सावज तयार केले होते . भर दिवस चोरी करण्यासाठी राजरोसपणे रेकी केलेल्या घरामध्ये अगदी साळसूदपणे जात. त्यामुळे शेजारपाजारील नागरिकांना या चोरांवर फारसा संशय घेणे शक्य नव्हते चोरी झाली की ते इतर जिल्ह्यात पळून जायचे त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे पोलिसांना इतके सहज नव्हते .पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि नेर पोलीस यांची चोरांचा मागोवा घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली . या पथकांनी चोरी करण्याच्या पद्धतीचा सूक्ष्म अभ्यास करून आणि तांत्रिक बाबी तपासून .शिवाय गोपनीय माहितीच्या आधारे या आरोपीना बेड्या ठोकल्या.

सर्व तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर त्यांची शोध मोहीम हाती घेण्यात आली होती यामध्ये संजय पांडुरंग नामनूर , सय्यद हनीफ सय्यद जाफर रा. नांदेड या आरोपीना अटक केली .या गुन्ह्यातील एक आरोपी सय्यद जाकीर सय्यद जाफर हा फरार असून त्याचा तपास सुरू आहे. या आरोपीविरुध्द अनेक ठिकाणी गुन्हे नोंद आहे . दोन्ही आरोपी विरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तसेच बाहेर जिल्ह्यात नांदेड परभणी हिंगोली येथे सुद्धा चोरी घरफोडीचे बरेच गुन्हे नोंद असून काही गुन्ह्यात सदर आरोपी त्या त्या पोलीस स्टेशनला सुद्धा अनेक गुन्हांमध्ये संशयित म्हणून हवे आहेत ..अशी असल्याची माहिती ही स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे.

तपास कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वनारे, यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी ही कारवाई पूर्ण करीत आरोपींना ताब्यात घेतले. या पोलीस अधिकच तपास करीत आहेत .