
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ही येत्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी तर शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली.
या शिष्टमंडळात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, विश्वजित कदम, नसीम खान यांचा समावेश होता.
दरम्यान, त्यापूर्वी ‘भारत जोडो’ यात्रेच्या तयारीच्या संदर्भात एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. उद्या मंगळवारीही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.


























































