
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत कोट्यवधी रुपये मोजून संघात घेतलेले खेळाडू फेल होताना आपण पाहिले. मात्र बोली न लागता, बदली खेळाडू म्हणून आलेला वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. एलिमीनेटर लढतीत सनरायझर्स हैद्राबादच्या या खेळाडूने 3 बळी घेतले आणि नाबाद 26 धावांची खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध विजय मिळवून दिला.
कसोटी क्रिकेटच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत नंबर एकला असणाऱ्या होल्डरला आयपीएल 2020 मध्ये कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. 75 लाखांची बेस प्राईज असलेला होल्डर अनसोल्ड राहिला. पण बोलतात ना नशीब कधी आणि कसे दरवाजा ठोठावेल हे सांगता येत नाही.
सुरुवातीच्याच लढतीत हैद्राबाद संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श आणि भुवनेश्वर कुमारला याला गंभीर दुखापत झाली. दोघेही स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. त्यामुळे हैद्राबाद संघाला गोलंदाजी आणि गरज भासल्यास फलंदाजी करणारा खेळाडू हवा होता.
3 वर्षांनंतर मिळाली संधी
अशा पद्धतीने होल्डरचे नशीब फळफळले. तब्बल तीन वर्षानंतर (2016) त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला अंतिम 11 खेळाडूत घेण्यासाठी देखील बरीच डोकेफोड करावी लागली. कारण होल्डरसाठी मोहम्मद नबी सारख्या मॅचविनर खेळाडूला बेंचवर बसवावे लागणार होते.
‘ज्याला सचिनचा वारसदार समजला, तो तर आफ्रिदी निघाला’, खराब कामगिरीमुळे पृथ्वी शॉ होतोय ट्रोल
6 लढतीत 5 विजय
सुरुवातीला होल्डरला देखील बेंचवर बसावे लागले. मात्र केन विलीयम्सन याला दुखापत झाल्यावर त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. तोपर्यंत 9 लढतीत हैद्राबादने 5 लढती गमावल्या होत्या. मात्र होल्डर आल्यावर हैद्राबादने अखेरच्या 3 लढतीत विजय मिळवला, तसेच एलिमीनेटर सामना देखील आपल्या नावे केला.
…तर त्याला कर्णधारपदावरून हटवले असते, 2 वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू विराटवर बरसला
दमदार कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये होल्डरने आतापर्यंत फक्त 6 लढती खेळल्या आहेत. यात हैद्राबादने 5 विजय मिळवले आहेत. या 6 लढतीत होल्डरने एकूण 13 बळी घेतले आणि 55 धावाही ठोकल्या आहेत, तसेच बंगळुरू विरुद्ध मोक्याच्या क्षणी त्याने विलीयम्सन सोबत नाबाद अर्धशतकीय भागीदारी करत संघाला विजय देखील मिळवून दिला.






























































