IPL 2020 – ठरलं! यंदाही मुंबईच चषक उंचावणार, ‘लकी’ आजींचे कमबॅक; दुबईत लावली हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली. या लढतीनंतर एका आजीचा फोटो व्हायरल झाला असून ‘आता इतर संघांनी गाशा गुंडाळावा’, असे ट्विट सोशल मीडियावर सुरू आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या आजी मुंबई इंडियन्ससाठी लकी असल्याचे म्हटले जात आहे. याआधी आयपीएल 2017 ची अंतिम लढत मुंबई इंडियन्स आणि पुणे सुपरजायंट्स सामना रंगला होता. या लढतीत मुंबई इंडियन्सने 1 धावेने विजय मिळवत तिसऱ्यांदा चषक जिंकला होता.

अंतिम लढतीत पुण्याला 4 चेंडूत 7 धावांची गरज असताना कॅमेरा एका आजींवर स्थिरावला. आजी प्रार्थनेमध्ये गुंग असल्याचे दिसले असल्याने वारंवार कॅमेरा त्यांच्यावर येत होता. मुंबईने अविश्वसनीय विजय मिळवल्यावर आजींचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

याच आजी गुरुवारी मुंबई विरुद्ध दिल्ली संघातील सामन्यादरम्यानही दिसल्या. त्यामुळे आता मुंबईला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. या लढतीत मुंबईने 200 धावा उभारल्या आणि दिल्लीला 143 धावांत रोखत फायनलमध्ये प्रवेश केला.

कोण आहेत या आजी?

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आजी नक्की कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचे उत्तर खुद्द अभिषेक बच्चन याने दिले आहे. 2017 ला देखील हाच प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा अभिषेक ताने ट्विट करून या ‘लकी’ आजीचा परिचय करून दिला होता. या आजी इतर कोणी नसून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची सासू आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्या आई आहेत. त्याचे नाव पूर्णिमा दलाल असे आहे.

screenshot_2020-11-06-11-39-01-674_com-android-chrome