जिंकलस..! सचिनने केले नितीश राणा व मनदीप सिंहचे कौतुक, वडिलांच्या निधनानंतरही…

शनिवारी दुपारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सायंकाळी किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना रंगला. कोलकताच्या संघाने दिल्लीचा, तर पंजाबच्या संघाने हैद्राबादचा पराभव केला. या विजयासह केकेआरचा फलंदाज नितीश राणा आणि पंजाबचा खेळाडू मनदीप सिंह यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून त्यांच्या धाडसाला लोक सलाम करत आहे.

टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही नितीश आणि मनदीप यांचे कौतुक केले आहे. कारण या दोघांनी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर देखील संयम दाखवला आणि मैदानात उतरून चांगली कामगिरी केली.

शनिवारच्या लढतीच्या एक दिवस आधी नितीश राणा याच्या सासऱ्यांचे कर्करोगामुळे निधन झाले. तरीही तो दिल्ली विरुद्ध मैदानात उतरला आणि दमदार अर्धशतक देखील ठोकले.

तर पंजाबचा खेळाडू मनदीप सिंह याच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. यानंतरही तो सनरायझर्स हैद्राबाद संघाविरुद्ध खेळण्यासाठी उतरला. या दोघांना सचिनने सलाम केला आहे.

‘आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने दुःख होते, मात्र यापेक्षा त्यांना अखेरचा निरोप आपण देऊ शकलो नाही याचे दुःख जास्त होते. या दुःखाच्या प्रसंगी मनदीप सिंह आणि नितीश राणा यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही दोघांनी चांगली कामगिरी केली’, असे ट्विट सचिनने केले.

दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने देखील मनदीपच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि कालचा विजय त्याच्या वडिलांना समर्पित केला.

screenshot_2020-10-25-16-23-49-080_com-android-chrome

आपली प्रतिक्रिया द्या