मी कधी परतेन मलाच माहीत नाही!

23

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराशी लढणाऱ्या इरफान खानची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे. इरफानच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी आहे. असे असले तरीही तो हिंदुस्थानात इतक्यात परतण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे. कारण मी कधी परतेन मलाच माहीत नाही असे त्याने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

‘कारवाँ’सह इरफानचा ‘पझल’ हा हॉलीवूड सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चाहत्यांना या दोन्ही सिनेमांची प्रतीक्षा आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच इरफानला न्यूरोएंडोक्राइन या दुर्धर कर्करोगाने ग्रासले. सध्या तो इंग्लंडमध्ये उपचार घेत आहे. आपल्या प्रकृतीविषयी तो चाहत्यांना ट्विटर हँडलद्वारे कळवत असतो. मी कधी परतणार याविषयी मला काहीच कल्पना नाही. या उपचारांचे परिणाम जाणून घेण्याचीही मला अजिबात घाई नाही असे त्याने ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. दरम्यान, कारवाँ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. इरफान हिंदुस्थानात नसल्यामुळे या सिनेमाच्या प्रमोशनची अवघड जबाबदारी आता या सिनेमातल्या नवोदित कलाकारांवर येऊन पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या