इरफानच्या लेकाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान गेल्यावर्षी आपल्यातून निघून गेला. इरफानच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. इरफानचा मुलगा बाबील खान हा आता अभिनय क्षेत्रात करियर करणार आहे. त्याला पहिला सिनेमा मिळाला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा बाबीलला लाँच करत आहे.

बाबीलच्या पहिल्या सिनेमाचे नाव ’काला’ आहे. नेटफ्लिक्सच्या या सिनेमात तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जी बाबीलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाबीलने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. नुकताच त्याने शूटिंगचा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला इरफानच्या चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाबील नेहमीच सोशल मीडियावर आपल्या दिवंगत वडिलांचे फोटो, व्हिडाओ आणि आठवणी शेअर करत असतो. काही दिकसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या 66 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खानला ’अंग्रेजी मीडियम’ सिनेमातील भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले. इरफानच्या वतीने बाबीलने पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी बाबील भावुक झाला, रडू लागला.