इशरत जहाँ इन्काऊंटर प्रकरण; सीबीआय कोर्टाकडून तीन अधिकाऱयांची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये 2004 मध्ये घडलेल्या इन्काऊंटर प्रकरणी सीबीआय न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तीन पोलीस अधिकाऱयांची निर्दोष मुक्तता केली. इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती हा गुप्तचर विभागाने दिलेले अहवाल फेटाळता येणार नाही, असे मतही न्यायालयाने नोंदविले आहे.

आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल, निवृत्त पोलीस उपअधीक्षक तरुण बारोट आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंजू चौधरी या पोलीस अधिकाऱयांची निर्दोष मुक्तता केली. इशरत जहाँ दहशतवादी होती याचे काही पुरावे गुप्तचर विभागाने दिले आहेत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांनी आपले कर्तव्य बाजवले, असे सीबीआय न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

15 जून 2004 रोजी अहमदाबाद येथील कोतरपूर क्वॉटर्सजवळ पोलीस चकमकीत इशरत जहाँ, जावेद शेख ऊर्फ प्रमेश पिल्लई, अमजद आणि जीशान जौहर हे ठार झाले होते.