
मुंबईत सध्या वाढलेले हवेचे प्रदूषण आणि हिवाळ्यात वाढणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी तीस फुटांपर्यंत कंपाऊंड वॉल बनवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शिवाय धुलीकणांना पसरण्यापासून आळा घालण्यासाठी ‘फॉग गन’ आणि प्रिंक्लरही बसवावे लागणार आहेत. यासाठी पालिकेने नियमावलीत सुधारणा केली असून पुढील आठवडय़ापासून याची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा दर्जा खालवला असून प्रदूषण वाढले आहे. मुंबईत सुरू असलेल्या प्रदूषणास बांधकामांची धूळ हे प्रमुख कारण असल्याचेही समोर आले आहे. यामुळे हवेचा स्तर (एक्यूआय-एअर क्वालिटी डंडेक्स) 132 इतका प्रचंड खाली घसरल्याने मुंबईच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
अशी होतेय कार्यवाही
धूळ नियंत्रण करण्यासाठी पालिकेच्या किभाग कार्यालयांच्या स्तराकर कृती दल अर्थात टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक किभागात तीन किषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
– तर मोकळ्या जागांवर डेब्रीज टाकताना आढळल्यास दहा ते 20 हजारांचा दंड आणि ‘काम बंद’ नोटीस बजावण्यात येणार आहे. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये विशेष पथकाची नजर राहणार आहे.
– रस्त्यांकर राडारोडा कचरा फेकणाऱ्यांकर आता आपत्कालीन किभाग आणि पोलिसांच्या माध्यमातून पाच हजार सीसीटीक्ही कॅमेऱ्यांची नजरही राहणार आहे.

























































