मराठी रंगभूमी प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न करणार

मराठी रंगभूमी समृद्ध आहे. त्याला दीर्घ परंपरा आहे. 100 व्या नाटय़संमेलनाची सुरुवात जोरात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी संमेलन होणार आहे. यानिमित्त मराठी रंगभूमीला प्रगल्भ करण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल, यासाठी नाटय़परिषदेकडून प्रयत्न केले जाणार आहे, असे मत 100 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी मांडले.

मोरया गोसावी क्रीडा संकुल येथील मुख्य सभामंडपात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, अजून पाच ठिकाणी हे संमेलन होणार आहे. या पाच ठिकाणी होणाऱ्या संमेलनाची ठिकाणी वेगवेगळी आहेत. काही मोठी शहरे आहेत, तर काही लहान शहरे आहेत. मराठी रंगभूमीचे प्रश्न त्या त्या गावानुसार बदलतात.  त्यानुसार मी आणि नाटय़ परिषद ते प्रश्न सोडकिण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. नाटय़ परिषदेला शासन आवश्यक ती मदत करत आहे. त्यामुळे सर्व प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. मराठी रंगभूमीच नाही, तर इतर रंगभूमींना सोबत एकत्र घेऊन काय करता येईल, हा विचार केला जाईल. त्यातून अशय, दिग्दर्शन, अभियन आणि निर्मिती यामध्ये आपल्याला नवीन काय करता येईल, याची चाचपणी केली जाईल.

केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातही मराठी नाटक पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी रंगभूमी प्रगल्भतेसाठी पाश्चात्य स्पर्श लागेल, त्यासाठी नाटक क्षेत्रातील मातब्बर क्यक्तींची मदतही घेतली जाईल. त्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नाटय़ आणि रंगकर्मी यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाईल, असे डॉ. पटेल यांनी सांगितले

माझ्या वेळीची मराठी रंगभूमी वेगळी होता. आताची वेगळी आहे. विजय तेंडुलकर, गिरीष कर्नाड, मोहन राकेश, बादल बाबू ते नाटककार वेगवेगळ्या भाषेत पोहचले. डिजिटल युगात नट आणि दिग्दर्शकाला आता स्कतःमध्ये बदल करायला पाहिजे.अनेक माध्यमातून आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे.

आम्ही 24 तास नाटके करतो – फडणवीस

नाटय़, साहित्य संमेलनात जाणे बाका प्रसंग असतो. अभिनेत्यातील अभिचा अर्थ अधिकनेता आणि निकट असा होतो. प्रेक्षकांच्या जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो. पूर्वी संमेलनाला राजकीय लोकांना बोलविल्यानंतर फार वाद होत. अलीकडच्या काळात हे कमी झाले आहे. कलाकारांनी आम्हाला मान्य केले. आम्ही 24 तास नाटके करतोच असा त्यांचा ठाम विश्वास झाला आहे, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कलाकारांनी एकमेकांना मान द्यावा – राज ठाकरे

पिंपरीः मी जेक्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो, तेक्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी  कलाकारांना दिला.