
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांनी गुरुवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष वायएस तेलंगणा पार्टीला (वायएसटीपी) काँग्रेस पक्षात विलीन केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शर्मिला या काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर शर्मिला यांनी काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच ब्लूप्रिंट तयार केली जाईल, असे शर्मिला या वेळी म्हणाल्या. शर्मिला यांना आता राष्ट्रीय स्तरावर एक नवीन पद दिले जाणार आहे.






















































