मुख्यमंत्र्यांनी मला ‘तू चीज बडी है मस्त-मस्त’ म्हटले, राज्यपालांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनखार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी माझ्याबाबत ‘तू चीज बडी है मस्त-मस्त’ असे शब्द वापरल्याचे धनखार यांनी म्हटले आहे.

राज्यपाल जगदीप धनखार यांनी सोशल मीडियावर एका बांगला वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या आधारे ट्विट केले आहे. या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी माझे नाव न घेता मला ‘तू चीज बडी है मस्त-मस्त’ असे म्हटले. मात्र मी याचे उत्तर देणए योग्य वाटत नाही, कारण मी त्या पदाचा मान राखतो, असे राज्यपाल म्हणाले आहेत.

राज्यपालांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ममता बॅनर्जी संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना दिसत आहेत. मी कधीही कोणाला आदर देण्यात कमी केलेला नाही. माननीय मुख्यंत्री असले तरी त्यांना आदर दिला आहे, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या दोघांमधील वाद आणखी काय रुप धारण करतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.