नवरा बायकोच्या भांडणात चिमुकलीचा जीव गेला, उपचारानंतर बाप पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरा-बायकोच्या भांडणात चिमुकलीचा जीव गेल्याची दुर्देवी घटना जालना येथील अंबड तालुक्यातील शहागड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चिमकलीच्या आईच्या जबाबावरून पती कृष्णा पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कृष्णा पंडित (31) यांचा संगणकाचा व्यवसाय आहे व विश्वकर्मा को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेली पत्नी मनीषा कृष्णा पंडित ही सोमवारी बँक बंद झाल्यानंतर पाच वाजता घरी गेली व या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भाडंणाचे रूपांतर हाणामारीत होऊन, पती कृष्णा पंडित यांने पत्नी मनीषा यांच्या डोक्यात वीट मारली व हातापायावर मारहाण केली. यामध्ये मनीषाच्या डोक्यात रक्त निघाल्याने खाजगी रुग्णालय गाठले यामध्ये तीला डोक्यात सहा टाके पडले तीने सोमवारी रोजी रात्री शहागड येथील झुंजुर्डे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. सोमवारची रात्र गेल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा पंडित यांने तिची मुलगी चिऊ उर्फ श्रेया पंडित (6) हिला शहागड येथील पैठण फाटयावरील पाहुण्याच्या वीट भट्टीवर घेऊन गेला व विषारी औषध स्वतः घेऊन मुलगी श्रेया उर्फ चिऊ हिला पाचले कृष्णा पंडित याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न यावेळी केला.

थोड्या वेळाने दोघेही बेशुद्ध व उलट्या होत असल्याने जवळच असलेल्या नातेवाईकांनी बघितल्याने तात्काळ दोघांनाही खाजगी रिक्षातुन प्रथम गेवराई व नतंर बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. बुधवारी 10 मे रोजी कृष्णा पंडित याची तब्येत बरी झाली. परंतु मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. आज 11 मे गुरुवारी सकाळी तिची प्राण ज्योत मावळली. बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार असून पती-पत्नीच्या भांडणात मुलीचा बळी गेल्याने शहागड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भांडण कोणत्या कारणाने झाले हे अद्यापही समजून आलेले नसून, मनीषा पंडित हिच्या जबाबावरून पती कृष्णा पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.