
जालन्यात वडीगोद्री येथे वीज कोसळून गायीचा मृत्यु झाल्याची घटना घडली. मात्र दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी त्या गायीचे श्वविच्छेदन करण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने ती गाय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणुन टाकल्याने पशुवैधकीय विभाग खडबडुन जागे होत 24 तासानंतर त्या गायीचे शवविच्छेदन केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात 11 ऑक्टोंबर रोजी पहाटे पहाटे विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडला. या पावसात वडीगोद्री येथील शेतकरी श्रीराम पंडित गावडे यांच्या गट नं 42 मध्ये जनावरे बांधले होते. बांधलेल्या जनावरांपैकी एका गायीच्या अंगावर विज कोसळून गाय दगावली. त्यामुळे शेतकऱ्याचे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले. सदर गायीचे शवविच्छेदन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार मदत मिळण्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायीचे शवविच्छेदन करण्यासाठी व घटनेची माहिती 11 ऑक्टोंबर रोजी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश अक्षये यांना सकाळी 7 वाजता देण्यात आली. परंतु मृत गायीचे शवविच्छेन करण्यासाठी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच अंबड तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकारी विशाल जाधव यांनाही संपर्क साधून ही वैद्यकीय अधिकारी सायंकाळपर्यंत आलेच नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्याने मृत गाय वडीगोद्री पशु वैद्यकीय दवाखान्यात आणून टाकली.
ही घटना मंगळवारी पहाटे घडुन सुध्दा आज बुधवार सकाळपर्यंत या मृत गायीचे शवविच्छेन करण्यास पशु वैद्यकीय अधिकारी धजावलेले नाहीत. उलट त्या शेतकऱ्यांची गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांनी भेट देवुन वस्तुस्थिती माहिती करून घेतली. गाय मृत होऊन 24 तास उलटुन ही शवविच्छेदन करण्यात आले नाही. उलट त्या अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली.गावातील ग्रामस्थ संतप्त होऊन मोठा जमाव आज सकाळी जमा झाला. त्यामुळे वरीष्ठ पशु वैद्यकीय अधिकारी वडीगोद्री धाव घेतली. परंतु पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची बाजु धरल्याने ग्रामपंचायतचे पदधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या वतीने पंचनामा करून ग्रामसभा घेऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या हालचाली सुरू होताच पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पडती बाजु घेत 24 तासानंतर मृत गायीचे शवविच्छेन केले. आप्पती व्यवस्थापनच्या नियमानुसार काही पशु, माणूस,असो त्याला तात्काळ मदत करण्याचे नियम अधिकाऱ्यांनी कागदावरच ठेवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या या कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.






























































