
स्थानिक गुन्हे शाखा जालनाच्या पथकाने जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागातील गावठी हातभट्टी अड्यावर छापे मारुन एकूण 6 लाख 11 हजार 900 रुपयाचा किंमतीचा मुद्देमाल जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केला आहे. ही कारवाई 5जुलै रोजी करण्यात आली आहे.
जालना शहरातील महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे अवैध दारुविक्री व तयार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी सूचना दिल्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी वेगवेगळे पथके तयार करून कैकाडी मोहल्ला भागातील गावठी हातभट्टी तयार करून विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे नियोजन आखले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास काही महिला गावठी हातभट्टया लावून दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली
होती. त्यावरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाच वेगवेगळया ठिकाणी एकाच वेळी छापा मारला.
सदर महिला घराच्या पाठीमागे मोकळया जागेत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावून दारु तयार करतांना रसायन व दारूसह चोरटी विक्री करताना आढळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाख 11 हजार 900 रुपयाचे रसायन, प्लॉस्टिक व लोखंडी ड्रम, कॅन, चालु हातभट्टया व गावठी हातभट्टी दारु असा मुद्देमाल जप्त करुन जेसीबी मशीनच्या मदतीने नष्ट केला.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पथकातील गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, भाऊराव गायके, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रुस्तुम जवाळ, जगदीश बावणे, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, देवीदास भोजने, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, रंजीत वैराळ, किशोर पुंगळे, भागवत खरात, कैलास चेके, योगेश सहाणे,सचिन राऊत, संजय सोनवणे, चालक रमेश पैठणे, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लू, मंदा नाटकर,रेणुका बांडे, गोदावरी सरोदे, अरुणा गायकवाड यांनी केलेली आहे.































































