कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर काश्मीरमधील सोपोरमधून गुरूवारी सायंकाळी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फैजान अहमद पॉल आणि मुझमील रशीद असी या दहशतवाद्यांची नावे असून ते लष्कर ए तोयबा आणि द रेजिस्टेंस फ्रंटशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, मॅगझीन आणि पाच पिस्टल राऊंड जप्त करण्यात आली आहेत.