जनता कर्फ्यूत परळीत रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल

1284

कोरोना रोखण्यासाठी रविवारी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाला परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, काही व्यक्ती कायदा मोडून रस्त्यावर फिरत होते. त्या व्यक्तींवर साथप्रतिबंधक कायद्यातंर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा मोडून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सार अफसर शेख, विशाल कांदे, नदीम खान, सौरभ तंबूड, शेख अलीम, सिद्धेश्वर साबळे, प्रकाश फड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या