झोपडी पाडल्यानंतर तीन वर्षांनी विकता येणार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp leader jitendra awhad

एसआरएबाबत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता एसआरएसाठी झोपडी निष्कासित झाल्यानंतर ती तीन वर्षांनी विकता येणार आहे. याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. लाखो गरीब लोकांना याचा फायदा होणार असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘एसआरए’बाबत एक महत्त्वपूर्ण आणि चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता झोपडी निष्कासित झाल्यानंतर तीन वर्षांनी ती विकता येणार आहे. सशुल्क घर विकत घेण्याचा दर अडीच लाख रुपये ठरवण्यात आला आहे. यामुळे गरीबांना आपल्या हक्काचे घर घेण्यास मदत होणार आहे. विरोधकांना काय टीका करायची ती करू द्या, सध्या महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे.