जगातील सर्वात बुटक्या महिलेचे नागपुरात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज नागपूरमध्ये जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगे हिने मतदान करून आपला हक्क बजावला. सर्वांनी मतदान करायला पाहिजे. सर्वांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. मीही माझे कर्तव्य बजावले आहे. देशाचे सजग नागरिक म्हणून आपण सर्वांनी मतदान केले पाहिजे, असे आवाहनही ज्योती यांनी केले. ज्योती यांची उंची 2 फूट 7 इंच आहे.