अभियांत्रिकी पदविकासाठी यंदापासून ‘के स्कीम’ अभ्यासक्रम, 49 विषयांसाठी प्रथम सत्राचा आराखडा तयार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा म्हणजेच 2023-24 पासून अभियांत्रिकी पदविकासाठी सुधारित अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमाला के-स्कीम या नावाने संबोधले जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रथम सत्रात प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना के स्कीम अभ्यासक्रम लागू असेल. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर 2025 पर्यंत विकसित केला जाणार आहे.

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करून शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एआयसीटीईने मान्यता दिलेल्या एकूण 49 पदविका अभ्यासक्रमाकरिता प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम परिणाम आधारित (ध्ल्tम्दस ँasाd) क्रेडिट सिस्टमवर आधारित असणार आहे. यामध्ये प्रत्येक सत्र हे 20-22 क्रेडिटचे असून एकूण सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम हा 120-132 क्रेडिटचा असेल, अशी माहिती तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली. तसेच औद्योगिक प्रशिक्षणामध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या 6 आठवडय़ांच्या कालावधी वाढवून आता 12 आठवडय़ांचा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

के-स्किम अभ्यासक्रमात काय
 डिजिटल मीडिया श्ध्ध्ण्sचा प्रभावी उपयोग करण्यासाठी.
 विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी योग आणि ध्यानसाधना
 इंडियन नॉलेज सिस्टीम, देशाच्या संविधानाचाही आंतर्भाव.
 विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्यासाठी स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन
 मल्टीपल एन्ट्री – मल्टीपल एक्झिटची तरतूद
 प्रथम वर्षाअंती एक्झिट करणाऱया विद्यार्थ्याना सर्टीफिकेट ऑफ व्होकेशन, द्वितीय वर्षात डिप्लोमा इन व्होकेशन, तृतीय वर्षात डिप्लोमा इन इंजिनीयरिंगची तरतूद.