काबूल बॉम्बस्फोटात 28 तालिबानी दहशतवाद्यांचाही मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानच्या काबुलमधील विमानतळावर गुरुवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या वाढताना दिसत आहेत. मृतांमध्ये 28 तालिबानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. काबूलमध्ये झालेल्या साखळी स्फोटात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी दावा केला आहे की, या स्फोटात त्यांच्या 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व सैनिक काबूल विमानतळाबाहेर सुरक्षेसाठी तैनात होते, असं तालिबान्यांनी सांगितलं आहे. तालिबान्यांचं म्हणणं आहे की, या स्फोटात अमेरिकेपेक्षाही आमच्या अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काबूल विमानतळावरील स्फोट आणि गोळीबारात सुमारे 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यात मोठ्या प्रमाणात अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली तेव्हा हे सर्व लोक काबूल विमानतळावरून विमान पकडण्याची वाट पाहत होते.