दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी करिना व सैफ नवीन घरात जाणार

अभिनेत्री करिना कपूर व अभिनेता सैफ अली खान हे लवकरच त्यांच्या खारमधील घरात राहायला जाणार आहेत. सैफिनाच्या दुसरे बाळ थेट नवीन घरात यावे असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी येत्या काही दिवसात नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

करिना व सैफ हे सध्या खारमधील फॉर्च्युन हाईट्स या इमारतीत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या इमारतीच्या शेजारील इमारतीत एक घर घेतले असून हे घर फॉर्च्युन हाईट्समधील घराच्या दुप्पट आहे. फॉर्च्युन हाईट्सचे शेवटचे दोन मजले हे करिना व सैफचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नवीन घराचे काम सुरू असून आता ते पूर्ण झाले आहे. करिना व सैफने स्वत: त्यांच्या आवडीनुसार हे घर डिझाईन केले आहे. त्यात लायब्ररी, तैंमूर व नवीन बाळासाठी नर्सरी, छोटा स्विमिंगपूल, सुंदर असं टेरेस बनविण्यात आलं आहे. या घराचे सर्व काम प्रसिद्ध डिझायनर दर्शिनी शाह करत आहेत.

फॉर्च्युन हाईट्समधील या घरात करिनाच्या बऱ्याच आठवणी आहेत. करिना लग्न करून याच घरात आली होती. तसेच तैमूरचा जन्म देखील याच घरात झाला आहे. त्यामुळे या घराच्या बऱ्याच आठवणी करिनाच्या मनात आहेत. हे घर सोडण्याआधी करिनाने तिच्या खास मैत्रिणी अमृता अरोरा, मलायका अरोरा व बहिण करिश्मा कपूर यांच्यासोबत पार्टी केली आहे. या पार्टीचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करत त्याला ‘फॉर्च्यून मेमरीज’ असे कॅप्शन दिले आहे.

करिना ही सध्या आठ महिन्यांची गरोदर असून येत्या मार्च महिन्यात तिची प्रसूती होणार आहे. करिना प्रेग्नेंट असली तरी तिची प्रेग्नेन्सीतली फॅशन अनेकांसाठी स्टाईल स्टेटमेंट बनत आहे. कामात सध्या करिनाने ब्रेक घेतला असला तरी 2021 मध्ये करिनाचा आमीर सोबतचा लाल सिंग चढ्ढा रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या