कर्नाटकातून 15 प्रवासी घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर पकडली

469

कर्नाटकमधील बंगळुरू येथुन राजस्थानकडे 15 प्रवासी घेऊन जाणा-या टेम्पो ट्रॅव्हलरवर आज कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली.या प्रकरणी गाडी क्रमांक केए – ५१-एए-९३६८ चा चालक व मालकांसह चौघांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रवाशी वाहतुक करणारा टॅम्पो ट्रॅव्हलर गोकुळ शिरगाव पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर तपासणीकरीता थांबवीला असता,यामधून १५ प्रवासी राजस्थान कडे जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक अभिषेक नागेश गौडस (२५,रा.साजीपुरा,अनेकल,जि.बेंगलोर), त्याचा साथीदार गजेंद्रराम रामु थिमापुरी (२६), गाडी मालक रधुनाथ कृष्णा रेडडी (रा.वालगेरे, अनकेल,जि.बेंगलोर) आणि ज्यांच्याकडे हे १५ प्रवासी कामाला होते ते,ओमप्रकाश चौधरी (३३, रा.भिनमल,जि.जालोर,राज्यस्थान) अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्णपणे संचारबंदीचे उल्लंघन करून टेम्पो ट्रॅव्हलर मधून १५ प्रवाशांना घेवुन टोल नाके व नाकाबंदी चुकवुन जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस पथकाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायद्यानुसार ट्रेम्पो ट्रॅव्हलरचे चालकांसह, मालक व ज्यांच्याकडे ते १५ प्रवाशी कामाकरीता होते,अशा चौघांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून,टेम्पो ट्रॅव्हलर सुद्धा जप्त करण्यात आला आहे.गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व पोलीस पथकाने ही कारवाई केली

आपली प्रतिक्रिया द्या