
67 व्या राष्ट्रीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून कस्तुरी या हिंदी चित्रपटाला पुरस्कार मिळाला. या चित्रपटाची निर्मिती केजच्या शिवसेनेच्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद कांबळे यांनी केले आहे. बाल कलाकार म्हणून समर्थ सोनवणे, श्रावण उपलक, वैशाली केंढले, विनोद कुलकर्णी, कुणाल पवार, अजय चव्हाण, राजू परदेशी, आकाश बनसोडे, विजय शिकरे, समाधान सरगोध्ये यांनी भूमिका केली आहे.
आठ महिलांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल याच्या निर्मात्या डॉ.अंजलीताई घाडगे व त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. केज तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

























































