‘जा रे जा रे पावसा माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस’, केदारची भावूक साद

258

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पावसाने चांगलाच खेळ केला आहे. आतापर्यंत दोन लढती पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाल्या आहेत, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. उद्या गुरुवारी टीम इंडियाचा न्यूझीलंडशी सामना होत असून या लढतीवरही पावसाचे सावट आहे. याच दरम्यान टीम इंडियातील मराठमोळा केदार जाधवने भावूक साद घातली असून पावसाला महाराष्ट्रात जाऊन बरसायला विनंती केली आहे.

‘जा रे जा रे पावसा माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस’, अशी साद केदारने इंग्लंडमधील पावसाला घातली आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना तिकडे इंग्लंडमध्ये मात्र पावसामुळे सामने रद्द होत आहे. त्यामुळेच केदारने इंग्लंडमधील पावसाला जा रे जा रे पावसा.. माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस अशी भावनिक साद घातली.

आपली प्रतिक्रिया द्या