काँग्रेस हायकमांडने मागवला महाराष्ट्रातील घडामोडींचा अहवाल, केरळचे काँग्रेस नेते चेंनथिला मुंबईत येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात दिलजमाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या नाराजीनाटय़ाची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली असून केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेंनथिला यांना मुंबईत पाचारण केले आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक पदवीधरमधील उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला होता. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट दिल्ली हायकमांडकडे पत्र पाठवीत त्यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर लगेच थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील खदखद समोर आली. पक्षश्रेष्ठाRनी यांची गंभीर दखल घेत प्रभारी एच.के. पाटील यांना तातडीने मुंबईत पाठविले होते. त्यानंतरही दोघांमधील वाद संपला नसल्याचे चित्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत दिसून आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस महासचिव के.सी. वेनुगोपाल यांनी आज एक पत्रक काढत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.