खगभरारी, यूटय़ूब चॅनेलवर मराठीत पक्ष्यांची शास्त्रीय माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘खग’ चॅनेलवर आतापर्यंत 11 व्हिडीओ अपलोड झाले आहेत. फ्लेमिंगो (रोहित पक्षी), रेड मुनिया (लाल मानोली), पॅरेडाईज फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक), बार हेडेड गूज (राजहंस), एशियन क़ुकू(कोकिळा), कॉमन टिल (चक्रांग बदक),बार हेडेड गूज (पट्ट कादंब),पाईड किंगफिशर (कवडय़ा धीवर), बाया व्हिवर (सुगरण, ओरिएंटल वार्फ किंगफिशर (तिबोटी खंडय़ा), कॉमन किंगफिशर ( सामान्य धीवर) आणि सारस पक्षी आदी पक्ष्यांची रंजक माहिती देण्यात आलीय.

राज्यातील पक्ष्यांची शास्त्र्ााrय माहिती मराठीतून देणारे ‘खग’ हे यूटय़ूब चॅनेल ठाणे येथील फोटोग्राफर दिवाकर ठोंबरे यांनी सुरू केलंय. अल्पावधीतच या चॅनेलला पक्षीप्रेमींकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. दिवाकर ठोंबरे दर बुधवारी ‘खग’ चॅनेलवर एका पक्ष्याचा तीन ते चार मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करतात. आतापर्यंत 11 व्हिडीओ त्यांनी अपलोड केले असून पहिल्या टप्प्यात किमान 100 व्हिडीओ अपलोड करण्याचा त्यांचा मानस आहे.

दिवाकर ठोंबरे फुलपाखरू अभ्यासक आहेत. गेली अनेक वर्षे ते शाळा-महाविद्यालयांमध्ये फुलपाखरू आणि पक्षी या विषयांमध्ये जागृती करतात. त्यांना असं आढळून आले की, मुलांना पक्ष्यांची ठरावीकच माहिती असते. मुलांना पक्ष्यांची शास्त्र्ाशुद्ध माहिती मनोरंजनात्मकरीत्या मराठीत उपलब्ध करून देण्याचे त्यांनी ठरवले. ठोंबरे हे आयटी क्षेत्रात काम करतात. तसेच उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे 350 पक्ष्यांचे फोटो काढलेले आहेत. त्याचा योग्य उपयोग करताना त्यांनी ‘खग’ या यूटय़ूब चॅनेलची निर्मिती केली.

खग म्हणजे पक्षी. पक्ष्यांचे प्रजनन, त्यांचे घरटं, आवाज, सवयी तसेच विशिष्ट नाव का पडलं याची माहिती दिवाकर ठोंबरे तीन ते चार मिनिटांच्या व्हिडीओतून देतात. पक्ष्यांबद्दल कुतूहल जागृत करून पक्ष्यांविषयी जास्त माहिती मिळवायला उद्युक्त करणं हा त्यांचा उद्देश आहे.

पूर्वी मुलांना त्यांचे पालक हातात मोबाईल फोन घेऊ नको म्हणून सांगायचे. पण लॉकडाऊनमुळे चित्रं बदललंय. मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल देण्याची वेळ आलीय. त्यामुळे यूटय़ूब हे माहिती मिळवण्याचे मुलांचे आवडते माध्यम झालेय. पण मराठी भाषेत पक्ष्यांची सायंटिफिक माहिती देणारे यूटय़ूब चॅनेल नाही हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी ‘खग’ या यूटय़ूब चॅनेल सुरू केलेय. – दिवाकर ठोंबरे