डेटींग साईटचा नाद पडला महाग, 73 लाख रुपयांचा लागला चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुंदर, हॉट, सेक्सी तरुणींना डेटींगला नेण्याचे स्वप्न बघणं खारघर येथील एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलच महागात पडलं आहे. कोलकातामधील एका टोळक्याने डेटींग अॅपच्या माध्यमाने या ज्येष्ठ नागरिकाला 73.5 लाख रुपयांचा चुना लावला. एवढेच नाही तर पोलिसात तक्रार केल्यास तुझी बदनामी करू अशी धमकीही त्याला दिली. पण तरीही हिंमत करत पीडीत ज्येष्ठ व्यक्तीने पोलिसात या टोळक्याची तक्रार केली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका तृतीयपंथीय व्यक्तीचा समावेश आहे. स्नेहा उर्फ माही दास (25) प्रबीर साहा (35) अर्नब रॉय (26) अशी त्यांची नावे आहेत.

2018 साली एका डेटींग अॅपवरून स्नेहाने खारघरमध्ये राहणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीला फोन केला होता. तिने त्याला स्पीड डेटींग, मेंबरशिप  व इत्यादी गोष्टींची ऑफर दिली होती. तुम्हांला हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळी सुंदर, हॉट, सेक्सी तरुणींबरोबर डेटींगला जाता येईल असे तिने त्यांना सांगितले होते. तसेच तिने त्यांना लाईफटाईम मेंबरशिप घेण्यासही सांगितले. यामुळे संबंधित व्यक्ती भलतीच खुश होती. सुंदर, हॉट, सेक्सी तरुणींचा सहवास लाभणार या कल्पनेने ते सुखावला होते.

पण ठरल्या वेळेप्रमाणे कोणीही त्यांना भेटायला आले नाही. यामुळे ज्येष्ठांचा पारा वाढला होता. त्याच रागात त्याने स्नेहाला फोन केला व मेंबरशिप रद्द करून पैसे परत मागितले. यावर स्नेहाने उलट त्यालाच धमकी दिली. तुम्ही आमच्याकडे मुली मागत आहात असे पोलिसांना सांगेल अशी धमकी तिने त्याला दिली. त्यांना भीति वाटावी व त्यांनी पुन्हा पोलिसात जाऊ नये म्हणून तिने त्याच्याकडे 75 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर बदनामी टाळण्यासाठी त्यानेही स्नेहाच्या सांगण्यावरुन दोन खात्यात पैसे जमा केले. पण तरीही स्नेहा त्याला धमक्या देत असल्याने त्याने वैतागून खारघऱ पोलिसात तक्रार केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.