
सात्त्विक साईराज राकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडीची ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याचबरोबर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘टीम इंडिया’चा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी पाठविले आहे. विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर या वेगवान गोलंदाजाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय’ने क्रीडा मंत्रालयाला शमीचे नाव समाविष्ट करण्याची विशेष विनंती केली होती. कारण मूलतः त्याचे नाव देशातील दुसऱया क्रमांकाच्या क्रीडा सन्मानाच्या यादीत नव्हते. 33 वर्षीय शमीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर हिंदुस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शमी पहिल्या चार सामन्यांत खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याने 5.26च्या सरासरीने सात सामन्यांत सर्वाधिक 24 बळी टिपले.
क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकित
n मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ः
सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन).
n अर्जुन पुरस्कार ः मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टिहीन क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे आणि अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि एम. श्रीशंकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसमुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर (शूटिंग), अनंत पंघल (गोल्फ), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस).
n ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार ः कविता (कबड्डी), मंजुषा पैंवर (बॅडमिंटन), विनीतकुमार शर्मा (हॉकी).
n द्रोणाचार्य पुरस्कार ः गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आर.बी. रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंह (हॉकी).





























































