
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थानच्या जयपूरमध्ये चायनीज मांजा सहा वर्षाच्या मुलाचा गळा चिरला. गळा चिरल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संपूर्ण देश मकर संक्रातीच्या उत्सवात असताना जयपूरमध्ये लहानग्याच्या मृत्यूमुळे दुःखाचे वातावरण आहे.
रविवारी संध्याकाळी विद्याधर नगर भातात पार्थ हा सहा वर्षाचा मुलगा खेळत होता. खेळताना त्याच्या गळ्याला एक मांजा अडकला आणि त्याचा गळा चिरला गेला. गळा चिरल्याने पार्थ खाली कोसळला. स्थानिक लोकांनी त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले. परंतु इस्पितळात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी मुबार व असिफ अली या दोन भावांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चायनीज मांजाही जप्त करण्यात आला आहे.






















































