
ऐतिहासिक वस्तू, घरं, प्राचीन पेण्टिंग्स याचा लिलाव होत असतो. मात्र केकचा लिलावाबद्दल कधी ऐकलेय का? हे वाचून आश्चर्य वाटले पण ही गोष्ट लवकरच सत्यात उतरणार आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण केकच्या तुकड्याचा लिलाव होणार आहे.
वृत्तानुसार, प्रिंसेस डायना आणि प्रिन्स चार्ल्सच्या लग्नातील वेडिंग केकचा एक तुकडा लिलावासाठी निघणार आहे. 1981 मध्ये झालेल्या या शाही लग्नाला तीन हजाराहून अधिक पाहुणे सहभागी झाले होते. या पाहुण्यांपैकी एक निगेल रिकेट्स होते. त्यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांनी 41 वर्षांच्या लग्नाच्या केकचा तुकडा जतन केला होता.
केकच्या तुकड्याचा लिलाव ब्रिटनमध्ये डोअर आणि रीस लिलावाद्वारे केकचा लिलाव केला जाईल. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, केकच्या तुकड्याची विक्रीपूर्व किंमत अंदाजे 27 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. केक त्याच्या मूळ बॉक्समध्ये पॅक केले आहे. लग्नासाठी 23 अधिकृत वेडिंग केक बनवले गेले होते. लूकवरून असे दिसते की आइसिंग सेंटरपीस फ्रूटकेकमधून हा केक आला होता. या केकला 5 थर होते आणि ते 5 फूट लांब होते.
याच केकचा एक तुकडा 2014 मध्ये जीबीपी 1,375 मध्ये विकला गेला होता, म्हणजेच या केकच्या तुकड्याचा लिलाव 1,27,000 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. प्रिन्सेस डायना आणि राजा चार्ल्स तिसरा यांचा विवाह 29 जुलै 1981 मध्ये झाला. हे लाखो लोकांनी टीव्हीवर पाहिले आणि त्याला ‘वेडिंग ऑफ द सेंच्युरी’ असेही म्हटले गेले. मात्र त्यांचे लग्न यशस्वी झाले नाही आणि 1992 मध्ये दोघेही वेगळे झाले.






















































