
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील 1989 मधील महापूर आणि 2019 मधील अतिवृष्टीय पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला घर बांधण्याकरिता 95 हजार 100 रुपये आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने एक कोटी ५६ लक्ष 42 हजार 300 रूपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील 2989 साली महापुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतू पुनवर्सन गावठाणात न जाता मूळ गावठाणात वास्तव्य करीत आहेत. जुलै-ऑगस्ट, 2019 मधील अतिवृष्टी पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावठाणातील घरपडझडीमुळे पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर मानवतेच्यादृष्टीने 95 हजार 100 रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी ६ हजार रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान दिले जाणार आहे. दि. 8 जुलै 2020 व 12 मे 2021 रोजीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयान्वये अटींच्या अधीन राहून 1 कोटी 56 लक्ष 42 हजार 300 रूपये इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
अटींबाबत :
१) ज्या बाधितांनी पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेले भूखंडाची विक्री केलेली आहे ते वगळता पूर्णत: पडझड झालेल्या ज्या भूखंडधारकांनी वाटप केलेल्या भूखंडावर अद्याप घर बांधकाम केलेले नाही अशा 153 बाधित कुटुंबांना त्यांना वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर रू.95 हजार 100 रूपये प्रति कुटुंब इतक्या मदतीचे वाटप करण्यात येईल.
२) ज्या बाधितांनी पुर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेले भूखंडाची विक्री केलेली आहे ते वगळून अंशतः घर पडझड झालेल्या बाधित कुटुंबांपैकी ज्यांनी पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडांवर बांधकाम केलेले नाही अशा 182 बाधित कुटुंबांना त्यांना वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर 6 हजार रूपये प्रति कुटुंब इतक्या मदतीचे वाटप करण्यात येईल.
३) बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्यांना नवीन गावठाणात भूखंड वाटप केले होते तथापि, या भूखंडाची त्यांनी विक्री केली आहे अशा 48 कुटुंबांना नवीन गावठाणात पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर हे शासकीय भूखंड विक्री तत्वावर उपलब्ध करून देतील. अशा कुटुंबांनी त्यानुसार नवीन भूखंड यापूर्वी खरेदी केला असल्यास अथवा चालू आर्थिक वर्षात भूखंड खरेदी केल्यानंतरच त्यांना मूळ गावठणातील त्यांच्या पूर्णतः पडझड झालेल्या घरांसाठी SDRF च्या निकषाप्रमाणे अनुक्रमे रु. 95 हजार 100 व रु.6 हजार प्रमाणे नवीन जागेवर घर बांधून स्थलांतरीत होतील या अटीवर मदत देण्यात येईल, असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे


























































