
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी
शिक्षक संचलनालय महाराष्ट्र व सलाम मुंबई फाऊंडेशन मार्फत सुरू असलेल्या तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत जि प पूर्ण प्राथमिक शाळा गावराई नंबर 1 या शाळेने अभियानाचे निकष पूर्ण करून आपली शाळा तंबाखूमुक्त बनवली आहे.
शिक्षण संचालनालय महाराष्ट्र सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या तंबाखू मुक्त शाळा अभियानामध्ये प्राथमिक शाळा गावराई नंबर 1 ने सहभाग घेत तंबाखू मुक्तीसाठी असलेल्या 11 निकष पूर्ण केले आहेत. तर तंबाखू मुक्त बाबत प्रबोधन आणि तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम याबाबत माहिती आणि जनजागृती करून जि प पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 ही शाळा तंबाखूमुक्त प्रयत्न केला. यामध्ये यश संपादन करत अकरा निकषांची पूर्तता करून शाळा तंबाखूमुक्त बनले आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता पाताडे, सहकारी शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या यशस्वितेबाबत केंद्रप्रमुख आनंद धोत्रे यांनी अभिनंदन केले आहे.





























































