खोटया धनादेशाप्रकरणी उसतोडणी कंत्राटदारास तीन महिन्याची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । कोपरगांव 

धुळ्यातील एका उसतोडणी कंत्राटदारास खोटया धनादेशाप्रकरणी तीन महिन्याची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रकाश गंगाराम देसले असे त्याचे नाव आहे.

येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांतर्गत अमृत संजीवनी शुगर ट्रान्सपोर्ट कंपनीकडून देसले याने घेतलेली उचल रक्कमेची परतफेड केली नाही. तसेच त्यापोटी दिलेला धनादेश खोटा असल्याकारणांने कोपरगांव येथील न्यायदंडाधिकारी पी. एन. देशपांडे यांनी देसले यास तीन महिने कैदेची शिक्षा व 4 लाख 80 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

प्रकाश गंगाराम देसले रा. विंचुर ता. जि. धुळे याने उस वाहतुकीसाठी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनी शिंगणापुर यांच्याकडे काही रक्कम उचल घेतली. तसेच त्यापोटी त्याने कंपनीला धनादेश दिला होता. पण बँक खात्यात रक्कम नसल्याने तो वटला नाही. रक्कमेची परतफेड न केल्यांने आरोपी प्रकाश देसले याच्याविरोधात कोपरगांव फौजदारी न्यायालयात अमृत संजीवनी तर्फे विजय नरोडे यांनी तक्रार दाखल केली. त्याची सुनावणी होऊन अंतिम गुणदोषावर आरोपी प्रकाश देसले यास तीन महिने कैदेची शिक्षा व चार लाख एैंशी हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ही नुकसान भरपाई न दिल्यास आणखी15 दिवसाची कैदेची शिक्षा ठोठावली आहे.या निकालामुळे उसतोड कंत्राटदारात खळबळ उडाली आहे.