कोपरगावात विवाहित तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात रविवारी सायंकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली. सचिन सर्जेराव सुपेकर (23) असे त्याचे नाव आहे. किरकोळ वादावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात राहणारा सचिन पेंटिंग काम करत होता. क्षुल्लकशा गोष्टीवरून त्याचा घरातल्यांबरोबर वाद झाला. हा वाद सहन न झाल्याने त्याने साडेसहा ते सातच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सचिनचा दोन वर्षापूर्वींच विवाह झाला होता. त्याला पत्नी तीन बहिणी,एक भाऊ आणि आजी असा परिवार आहे. दरम्यान , कोपरगाव याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.