
जुन्या नागपूर मुंबई महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप व्हॅन उलटून महामार्ग लगतच्या विहिरीत पडल्याने ल्याने भीषण दुर्घटना झाली आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.त्यात कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती येथून सहा जण तर दोन जण रवंदे येथून असे आठजण खुलताबाद येथे लग्नासाठी चालले होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व जण या अपघातातून सुखरूप बचावले आहे.
कोपरगाव -जुन्या नागपूर मुंबई महामार्गावर हॉटेल निसर्ग जवळ तळेगाव मळे शिवारात गुरुवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन एम एच 15 जेसी 1023 ही पिकअप व्हॅन चालली होती. समोरच्या वाहनाने कट मारल्याने चालकाचा ताबा सुटून ही व्हॅन पलटी झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या विहिरीत पडून हा भीषण अपघात झाला. व्हॅनमध्ये तीन वर्षाच्या बाळासह एकूण 8 जण होते. त्यात महिला व वृद्धांचाही समावेश होता. सुदैवाने व्हॅनचे तोंड वरती असल्याने आतील प्रवाशांना गंभीर इजा झाल्या नाहीत व मोठी जीवित हानी टळली. स्थानिक गावकऱ्यांनी या सर्वांना बाहेर काढले असून उपचारासाठी काहींना कोपरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात तर काहींना वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे
दरम्यान, घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड , पोलीस उपनिरीक्षक कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल आंबादास वाघ, जयदीप गवारे, कोतकर, पोलीस नाईक साळुंके आपल्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान दुचाकीसह आणखी एक जण पाण्यात पडलेला आहे अशी शंका उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केल्यामुळे पडलेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विद्युत मोटारीच्या साह्याने विहिरीचे पाणी उपसण्यास सुरुवात केली आहे




























































