
सामना प्रतिनिधी । कुडाळ
शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बुधवारी कुडाळ शिवसेना शाखेत साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख तथा आ. वैभव नाईक, तालुका प्रमुख राजन नाईक, अभय शिरसाट, दयानंद चौधरी, महिला आघाडी तालुका संघटक शिल्पा घुर्ये, जि.प.सदस्य अनुप्रिती खोचरे, युवासेना तालुकाप्रमुख राजु जांभेकर, जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, गणेश भोगटे, जीवन बांदेकर, श्रेया गवंडे, मेघा सुकी, भारती मठकर, सुप्रिया मांजरेकर, शितल देशमुख, नितीन सावंत, युवासेना शहर प्रमुख कृष्णा तेली, अल्पसंख्यांक सेल तालुका प्रमुख अक्रम साठी, मागासवर्गीय सेल तालुका संघटक भुपेश चेंदवणकर, सतीश कुडाळकर, गोट्या चव्हाण, नागेश नाईक आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.































































