
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला जाऊन आल्यापासून या बेटाची जगभरात चर्चा रंगली आहे. लक्षद्वीप जगभरात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे. गेल्या काही दिवसांत लक्षद्वीप गुगलवर इतक्या मोठय़ा प्रमाणावर सर्च करण्यात आले आहे की गेल्या 20 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. मालदीवमध्येही लक्षद्वीप सर्च केले जातेय. त्यामुळेच अनेकांनी मालदीव सोडून आता लक्षद्वीपचे तिकीट बुकिंग सुरू केले आहे.






















































