यमाल बंधूंनी लक्ष वेधले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजयानंतर स्पेनचा स्टार फुटबॉलपटू लामिन यमाल आणि त्याचा भाऊ कीन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. या दोन्ही भावांनी आनंद असा साजरा केला की, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कीन यमालकडे धावत गेला

स्पेनच्या विजेतेपदानंतर कीन यमालकडे धावत गेला. यमालने त्याला लगेच उचलून घेतले. प्रत्येक सामन्यादरम्यान कीन स्टँड्समध्ये बसून स्पेन आणि यमालला पाठिंबा देताना दिसत होता.

ट्रॉफीसोबत पोज

कीन आणि यमाल यांनी फिफा विश्वचषक ट्रॉफीसोबत पोज दिली. हे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या अंदाजात दिसले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यमाल आणि कीन हे सावत्र भाऊ आहेत, त्यांच्या वयात 16 वर्षांचे अंतर आहे. कीन फक्त तीन वर्षांचा आहे, तो बार्सिलोनाच्या सामन्यांदरम्यान अनेकदा त्याच्या भावासोबत दिसतो.