
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दहशतवादाचा मार्ग सोडून हिंदुस्थानी लष्करात सामील झालेले जवान लांस नायक नजीर वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वाणी हे नोव्हेंबर 2018 ला दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. राष्ट्रपती भवनाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती समोर आली आहे.
Sources: Lance Naik Nazir Wani, who was a terrorist once, to get Ashok Chakra posthumously. He lost his life during operations in Shopian, J&K last year. He had joined 162 Territorial Army battalion in Kashmir & had received Sena Medal twice.
— ANI (@ANI) January 24, 2019
कुलगाम जिल्ह्यातील चेकी अश्मूजी गावचे रहिवासी असलेले नजीर वाणी यांचे दहशतवाद्यांनी ब्रेन वॉश केले होते. त्यामुळे त्यांनी हिंदुस्थानविरोधात लढा पुकारात दहशतवादाचा मार्ग निवडला होता. मात्र 2003 मध्ये त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडला व 2004 मध्ये ते लष्करात भरती झाले. त्यानंतर 2007 ते 2017 मध्ये त्यांना शौर्य पुरस्कार देण्यात आले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये शोपियां जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाले. या चकमकीत त्यांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यासाठी आता त्यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.






















































