वाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला

24

सामना प्रतिनिधी, मुंबई

जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा चोरलेला लॅपटॉप वाळूत लपवून ठेवणाऱ्या चार जणांना सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. गोपाळ यादव, दीपक मिथुन राय उर्फ नाले, मिल्टन बडोई उर्फ छोटू, प्रसन्न राजू सिंग अशी त्या चौघांची नावे आहेत. ते चौघेही पोलीस कोठडीत आहेत.

मूळचा कोलकाताचा रहिवासी असलेला देवाशिष दत्ता हा काही दिवसांपूर्वी बँक प्रशिक्षणासाठी मुंबईत आला होता. या प्रकरणी त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .वरिष्ठ निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या पथकातील सुरेश वळवी आणि पथकाने तपास सुरु केला. शोध मोहीम सुरु असताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यानी बॅग चोरीची पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी चोरीला गेलेले सामान हस्तगत केले.

आपली प्रतिक्रिया द्या