
मणिपूरच्या चुरचंदपूरमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या आजच्या जिल्ह्या दौऱ्यापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर जमाव बंदी घालण्यात आली आहे आणि मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुवारी, भाजप सरकारने आरक्षित आणि संरक्षित जंगले आणि पाणथळ क्षेत्रांचे सर्वेक्षण केल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जमावाने तोडफोड केली आणि आग लावली.
चुराचंदपूर जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त एस. थियेनललजॉय गंगटे यांनी लिहिले की, ‘जिल्ह्यात सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता आणि मानवी जीवन तसेच मालमत्तेला गंभीर धोका असल्याचं लक्षात घेत मेळावे रद्द करून, जमाव बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’. सरकारने गुरुवारी आदेश जारी केला आहे.
‘आदिवासी मंचाने पुकारलेला संपूर्ण बंद पुकारल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला असून सोशल मीडिया आणि नेटवर्किंग साइट्सद्वारे लोकांची जमवाजमव होण्याची शक्यता’ देखील या आदेशात नमूद करण्यात आली आहे. चुरचंदपूर व्यतिरिक्त फेरझॉल जिल्ह्यातही पाच दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बिरेन सिंग या ठिकाणी व्यायाम शाळा आणि क्रीडा सुविधांचं उद्घाटन करणार होते.
या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बिरेन सिंग आज भेट देणार असलेल्या हॉलमध्ये प्रचंड जमाव खुर्च्या फोडताना आणि मालमत्तेचे नुकसान करत आहे. आंदोलकांनी क्रीडा साहित्य आणि कार्यक्रम स्थळही पेटवून देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे की नाही याची अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.
भाजप सरकारच्या आरक्षित व संरक्षित जंगले आणि पाणथळ क्षेत्रांच्या सर्वेक्षणाला आक्षेप घेणाऱ्या आदिवासी नेते मंचाने आज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात बंद पुकारला आहे.























































