विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट; 12 जानेवारीला ‘सूर लागू दे’ प्रदर्शित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. येत्या 12 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘सूर लागू दे’चा ट्रेलर लक्षवेधी आहे. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांची केमिस्ट्री, अभिनयातील परीपक्वपणा आणि देवाणघेवाण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. मेघना नायडू हिचीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रवीण बिर्जे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर संगीत पंकज पडघन यांचे आहे.

‘सूर लागू दे’ हा चित्रपट समाजात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब दाखवणारा आहे. . एखादी चांगली गोष्ट करताना वय केवळ आकडा बनून राहातं. आयुष्याच्या संध्याकाळीही इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश ’सूर लागू दे’द्वारे सर्वदूर पोहोचणार आहे.