उशिरा आदेश काढल्याने तयारीला वेळच मिळाला नाही, बहुतांश शाळा पहिल्या दिवशी बंदच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरू लागली असून, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी होऊन दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून काही नियमावलीत पुन्हा कॉलेज कॅम्पस गजबजणार आहे.

अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतन व संबंधित शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग आजपासून सुरू करण्यास अटी व शर्तींस अधीन राहून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. 25 जानेवारीच्या परिपत्रकातील सर्व अटी-शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. 48 तासांनी आरटीपीसीआर तपासणी न करता, दोन्ही लसीकरण पूर्ण झालेले, कोरोनाची लक्षणे नसलेल्या शिक्षक, कर्मचार्‍यांना महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहता येणार आहे.

लोकसंख्येच्या 1 टक्का कोरोना रुग्ण असलेल्या गावात, शहरांत तेथील महाविद्यालय व्यवस्थापन समिती व पालक, शिक्षक समित्यांनी तत्काळ बैठक घेऊन प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी एक दिवसाआड बोलावणे, ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू ठेवणे. प्रत्येक शैक्षणिक घटक या दोन्ही गटांना शिकविणे. विद्यार्थ्यांना दोन वर्गांत समसमान विभागून बसविणे, उपलब्ध सर्व शिक्षकांचा एकत्रित वापर करून शिक्षण देणे, यासाठी एका सत्रात एरवी भरणारी महाविद्यालये वर्गखोल्यांच्या उपलब्धतेप्रमाणे दोन सत्रांत बोलवावी तसेच शिक्षकांच्या दैनंदिन तासिका वाढवण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.