लातूर शहरात विनाकारण फिरणारे व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची मनपाने केली कोरोना चाचणी

लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे आयुक्त यांच्या आदेशानुसार साहाय्यक आयुक्त वसुधा फड, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी रविवारी मॉर्निंग वॉक बहाद्दरावर दंडात्मक कार्यवाही करून करोना चाचणी 36 जणांवर करण्यात आली. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अमन मित्तल (भा.प्र से) वसुधा फड यांच्या सूचनेनुसार कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने शहरात फिरत आहेत. वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.त्यामुळे अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही सोबतच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

रविवारी अशा काही व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 36 लोकांचा 18000 दंड वसूल करून त्याच्या अॅन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पुजारी PSI धनंजय जाधव, गोविंद चामे, काका साहेब बोचरे, विश्वास जाधव अंगद क्षिरसाठ, रमेश कांबळे, चालक बालाजी झोडपे, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी स्वच्छता निरीक्षक रवि शेंडगे, विक्कि खंदारे, शेख वजाहत, प्रमोद काळे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

इतर मुख्य चौक येथेही अशा चाचण्या केल्या जाणार आहेत. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये. स्वतः सोबतच कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अमित देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्ष नेता दिपक सुळ, स्थायी समिती सभापती दिपक मठपती, आयुक्त अमन मित्तल (भा.प्र.से) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या