लातूरात दुचाकीस्वाराने साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातुरातील केशवराज विद्यालयातील शिक्षिका शाळा संपवून घराकडे परत जात असताना दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. 1 लाख 78 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शैलजा कुलदीप देशमुख या शिक्षिका (रा. विशाल नगर गगणविहार सोसायटी, लातूर) या केशवराज विद्यालयातून आपल्या घराकडे चालत जात होत्या. गणविहार सोसायटीच्या समोरील रस्त्यावर अचानक त्यांच्या समोर दुचाकीस्वार आला. त्याच्या अंगामध्ये चेक्सचा लाल रंगाचा शर्ट होता. काळ्या रंगाची पॅन्ट होती. त्याने शिक्षिका शैलजा देशमुख यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र (किंमत 1 लाख 78 हजार 500 रुपये) पळवून नेले. अचानक मंगळसूत्राला हिसका मारल्यानंतर त्यांना चक्कर येईन त्या खाली बसल्या. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.