
मुंबई विद्यापीठाच्या पाच वर्षीय लॉ (एलएलबी/बीएलएस) अभ्यासक्रमाच्या तिसऱया सत्रातील परीक्षांच्या तारखांमध्ये विद्यापीठाने बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा आता 3 जानेवारी, 6 जानेवारी आणि 8 जानेवारी 2020 मध्ये होणार आहेत. नाताळ सुट्टीच्या अनुषंगाने विद्यापीठाने हा बदल केला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार 23, 27 आणि 30 डिसेंबर रोजी या परीक्षा होणार होत्या. याव्यतिरिक्त विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमांच्या कोणत्याही परीक्षांच्या तारखांत बदल केले नसल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. याबाबत विद्यापीठाने परिपत्रक जारी केले असून संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

























































