वसंतदादा पाटील कायदा महाविद्यालयात लिगम कार्निव्हलचा जल्लोष

शीव येथील वसंतदादा पाटील कायदा महाविद्यालयात लिगम कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निव्हलचे प्रायोजकत्व सांडू ब्रदर्स यांनी स्वीकारले होते. संस्थेचे जनरल सेक्रेटरी अॅड. अप्पासाहेब देसाई, कॅम्पस डायरेक्टर प्रो. अशोक चव्हाण यांच्या हस्ते लिगम कार्निव्हलचे उद्घाटन करण्यात आले. लिगम कार्निव्हलमध्ये कायदा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार देखील सादर केले. मुख्याध्यापक दीपा वग्यानी, गोवर्धन, सचिन बोटे, गौरी माने, आयेशा, अंजली शिंदे, पूजा सावंत, स्मिता सोनवणे या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. लिगम कार्निव्हलच्या यशस्वी आयोजनासाठी कल्चरल कमिटी, सौरभ धर्माधिकारी, जगदिश गरदाडे, अनिस अन्सारी, सिद्धांत बनकर, अजित पाखरे आणि हरिश चाळके यांनी परिश्रम घेतले.